अचलेर , दि . १५ : जय गायकवाड
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे
उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमाच्या निमित्ताने उस्मानाबाद जिल्हा महाबीज व्यवस्थापक डॉ.राजू माने यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अचलेर येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या सभागृहात संपन्न झाले.
प्रारंभी डॉ.माने यांचा शाल,श्रीफळ,फेटा बांधून अधिराज इंटरप्रायजेस चे मालक अनिल कदारे व श्यामदादा कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोणतेही पिक घेत असताना त्यासाठी घ्यावयाची काळजी व करावयाचे उपाय याविषयी डॉ.माने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी दत्तात्रय पाटील,आप्पु कदारे, महादेवप्पा कदारे,जितेंद्र थिटे,देविदास माने,प्रविण सोमवंशी,मनोज लोखंडे,लक्ष्मण रोट्टे,मेघराज माने,नाना चव्हाण, दयानंद कमळापुरे, एम.एस.सी. कृषी क्षेत्राचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अजित लोखंडे,पत्रकार जय गायकवाड यांच्यासह गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.