ताज्या घडामोडी


नळदुर्ग , दि . १५ : विलास येडगे

नळदुर्ग येथे दि.१५ नोव्हेंबरपासुन  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शहरात फिरत्या पथकाद्वारे घरोघरी जाऊन कोविड लस लाभार्थ्यास देण्याच्या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ३० नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ शहरातील चावडी चौकातुन  करण्यात आला असुन  सांयकाळ पर्यंत जवळपास ९० लाभार्थीना लस देण्यात आले आहे. 
      

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक बसवराज धरणे, नितीन कासार, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,शहर भाजपा अध्यक्ष पद्माकर घोडके, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, दादासाहेब बनसोडे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, आदीजन उपस्थित होते.
      

नळदुर्ग शहरांतील प्रत्येक नागरीकांचे लसीकरण होण्याबरोबरच शहरात शंभर टक्के लसीकरण व्हावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक फिरते पथक तयार करण्यात आले आहे. या पथकसोबत नगरपालिकेचे कर्मचारी आहेत. या फिरत्या पथकाच्या मदतीला रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली आहे. घरोघरी जाऊन ज्यांचे अद्याप कोविड लसीकरण झाले नाही, अशा नागरीकांचे लसीकरण आरोग्य विभागाचे कर्मचारी करणार आहेत. हा लसीकरणाचा कार्यक्रम दि.१५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. आरोग्य सेविका सौ. सुमन फुले या लसीकरण कार्यक्रमाच्या प्रमुख आहेत.
       

या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ ऐतिहासिक चावडी चौकात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन आरोग्य सेविका सुमन फुले यांनी केले. यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी मुश्ताक पटेल,मुनीर शेख, शहाजी येडगे, ज्योती बचाटे, आण्णा जाधव, श्री पुंड आदीजन उपस्थित होते.
 
Top