वागदरी , दि . १५: एस.के.गायकवाड

केरुर ता.तुळजापूर येथे आदिवासी क्रांती वीर बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    

आँल इंडिया ब्लू टायगर आदिवासी पारधी सेनेच्या वतीने केरुर ता.तुळजापूर येथे आदिवासी क्रांती वीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आँल इंडिया ब्लू टायगर आदिवासी पारधी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंडित भोसले हे होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ कानडे,रिपाइंचे (आठवले) जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, माजी सरपंच आप्पासराव गाडेकर,ग्रा.प.सदस्य लक्ष्मण देवकर आदी होते.


   
प्रारंभी आदिवासी क्रांती विर बिरसा मुंडा,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आभिवादन करण्यात आले.
    

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भैरवनाथ कानडे म्हणाले की,आदिवासी क्रांती वीर शहीद बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या न्यहक्कासाठी दिलेला लढा म्हणजे मानवाच्या वेदनांचे रुपांतर संवेदनामध्ये होऊन केलेली क्रांती असून त्यांचा हा क्रांती लढा आपणा सर्वाना प्रेरणादायी आहे.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक आँल इंडिया ब्लू टायगर आदिवासी पारधी सेना महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनिताताई भोसले यांनी केले, सुत्रसंचलन एस.के.गायकवाड यानी केले व आभार  प्रदिप भोसले यांनी केले. 
    

यावेळी आँल इंडिया ब्लू टायगर आदिवासी पारधी सेनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश देवकर,रिपाइंचे (गवई) केरूर शाखा अध्यक्ष किर्तीपाल गायकवाड,शिवाजी कांबळे, संदीप गायकवाड, रवी भोसले, सागर डोळसे,अजय भोसले, ज्योती भोसले, लताबाई भोसले (नांदेड) सह महिला ,युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top