नळदुर्ग , दि . १५ : 


शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग क्र . 652 नळदुर्ग अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत न्यायालयाच्या  आदेशाचे आवमान करून संबंधितानी रस्त्याचे काम केले आसुन यांची चौकशी करून संबंधितावर   कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने  शहापूर ता . तुळजापूर येथील तलावात  सोमवार दि. १५ नोव्हेंबर रोजी  जलसमाधी आंदोलन करण्यात आले.



 यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित ठेकेदार व आधिकारी न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचे आवमान करून केलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी,  यासाठी शेतकरी  जलसमाधी घेण्यासाठी तलावाकडे निघाले आसता तुळजापूर तालुक्याचे नायब तहसिलदार   संतोष पाटील ,  नळदुर्ग पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक  जगदीश राऊत  यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढु आसे आश्वाशीत केले.  

यावेळी शेतक-यानी आक्रमक पवित्रा घेतला . यावेळी शेतकऱ्यांना चर्चा करावी आशी विनवणी संबंधित अधिका-यांनी केली असता  शेतकरी व आधिकारी यांच्यात झालेल्या चर्चा नुसार आठ दिवसात शेतकरी व जिल्हाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, राष्ट्रीय महामार्ग आधिकारी याची संयुक्त बौठक घेऊन यावरर तोडगा काढण्यात येईल असे  नायब तहसिलदार संतोष पाटील  यांच्या मध्यस्थीने बौठकीचे आयोजन तहसील कार्यालय तुळजापूर येथे करण्यात येईल असे सांगण्यात आले.


  शेतकऱ्यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत  यांनी  बैठकीपर्यंत रस्त्याचे काम करु नये असे राष्ट्रीय महामार्ग आधिकारी यांना सांगितले. त्यामुळे जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आसल्याचे शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले.


 यावेळी  सहाय्यक  पोलिस निरीक्षक  सुधिर मोटे, राष्ट्रीय महामार्गाचे उपकार्यकारी अभियंता  स्वामी  ,  भिमाशंकर मिटकरी ,  शेतकरी संघर्ष समितीचे  दिलीप जोशी,  सरदारसिंग ठाकुर, मेजर शिदे,संतोष फडतरे,विक्रम निकम,नरसिंग निकम, दिलीप पाटील, व्यंकट पाटील, तौलू पटेल, कशिनाथ काळे,सुभाष पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक शाहाजी सोमवशे, बालाजी ठाकूर,  प्रताप ठाकूर,शहापूर गावचे सरपंच  उमेश गोरे,उपसरपंच  प्रदीप काळे, माजी सरपंच  पाडुरंग सुरवसे, विजय पवार, सचिन काळे,पोलिस पाटील  बालाजी खरात, हारीदास सुरवसे,  जनार्धन गोरे, उल्हास मोरे, तुकाराम सुरवसे ईत्यादी उपस्थित होते. यावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक  जगदीश राऊत यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
 
Top