काटी , दि . १५

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 14 रोजी एस.एम.गृपच्या वतीने क्रांतीचे बीजारोपण करणारे आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त येथील साठे नगरमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर येथील अण्णा भाऊ साठे नगर मार्गावरील चौकास देशसेवेसाठी व  इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवत राहणारे क्रांतीच्या लढ्याला नवा आयाम देणारे "आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे" असे नामकरण करून या  नामफलकाचे उद्धघाटन ग्रा.पं.सदस्य संजय महापुरे, अनिल बनसोडे यांच्या हस्ते  करण्यात आले. 
          

याप्रसंगी ग्रा.प. सदस्य संजय महापुरे, ग्रा.प. सदस्य अनिल बनसोडे, राजु हांडे, कवी आबा काळे आदी मान्यवरांसह अण्णा भाऊ साठे नगर मधील सदस्य, एस.एम.गृपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top