तुळजापूर , दि .२
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कसारे गावचे मागासवर्गीय सरपंच महेश बोराडे यांचा अवमान केल्याप्रकरणी तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) च्या वतीने निदर्शने आंनदोलन करून निषेध करण्यात आला.
याप्रसंगी तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कसारे ता.संगमनेर येथील मागासवर्गीय सरपंचाचा आवमान करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, त्याच सरपंचावर दाखल करण्यात आलेला खोटा दरोडाचा गुन्हा विनाअट मागे घ्यावा, तुळजापूर येथील कुतवळ हाँस्पिटलचा परवाना कायम स्वरूपी रद्द करण्यात यावा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अनाधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, तुळजापूर पंचायत समितीमधील रमाईसह अन्य घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचे बिल देण्यास टाळा टाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा युवा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, जेष्ठ कार्यकर्ते प्रताप कदम,तालुका उपाध्यक्ष विठ्ठल जटीथोर,शहाजी मस्के,तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम,नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, रिपाइंचे विष्णु सोनवने,आमोल कदम,प्रा.अशोक कांबळे,दिपक कदम,सुशांत कदम,ज्ञानोबा बनसोडे,उत्तम सुरवसे सह कार्यकर्ते उपस्थित होते.