काटी , दि .०१ , उमाजी गायकवाड 

 तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायतीच्या सहा कर्मचाऱ्यांचा मागील आठ ते नऊ  महिन्यांचा पगार थकला आहे. कर्मचाऱ्या मार्फत थकीत पगाराबाबत  ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी मागणी करूनही पगार दिलेला नाही. कोरोनाच्या काळात या सर्वच कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र प्रामाणिकपणे काम केले आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतने दिलेली कामांची आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीत असतात.त्यांना प्रोत्साहनपर अतिरिक्त मानधन देणे गरजे असताना ऐन दिवाळी सणातही त्यांना पगारापासून वंचित ठेवले गेले आहे. त्यामुळे त्यांनी दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.


या कर्मचाऱ्यांवर ऐन दिवाळीत खऱ्या अर्थाने उपासमारीची वेळ आली होती. हि बाब लक्षात घेऊन उस्मानाबाद येथील सन  ग्रुपच्या वतीने काटीचे सुपुत्र  सन ग्रुप उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अमरसिंह देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य संजय देशमुख, विजयसिंह देशमुख, अजय देशमुख या बंधूंनी उद्योजक संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सन्मान करावा, त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याची गरज ओळखून "जिथे कमी तिथे आम्ही" अशी भूमिका घेत  ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत सुरवसे, विलास सपकाळ, दत्ता छबिले, अनिल बनसोडे, सविता बनसोडे, पोपटबाई बोराडे या सहाही कर्मचाऱ्यांना  दिवाळीसाठी लागणाऱ्या संपूर्ण किराणा साहित्याच्या किटचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन सयाजीराव देशमुख हे होते. किराणा साहित्य किट वाटपाबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजकांचे आभार व्यक्त करून दिवाळी भेटीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
        यावेळी सन ग्रुप उद्योग समुहाचे अमरसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, उद्योजक तथा माजी पंचायत समिती सदस्य संजय देशमुख, विजयसिंह देशमुख, अजय देशमुख, दादा बेग, धनाजी गायकवाड, वसंत हेडे, बळी चवळे, राजेंद्र गाटे,कु. ईश्वरी संजय देशमुख,कालिदास शिंदे, बाळासाहेब मासाळ, दत्तात्रय ढगे, श्रावण वाघमारे, सिध्दु बनसोडे आदी मान्यवर होते.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रावण वाघमारे यांनी केले तर आभार वसंत हेडे यांनी मानले.
 
Top