तुळजापूर , दि . १

मोबाईलच्या अति वापरामुळे माणसाचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर कामी करण्याचे आवाहन ह.भ.प.इंदुरुकर महाराज यांनी केले.


  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक विजय  कंदले , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद  कंदले यांनी अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने केले.
    तरुणांनी आपली ऊर्जा विधायक काम करिता वापरावी. व्यसनापासून दूर रहावे भारतीय संस्कृतीची जपणूक सर्वांनी करावे दैनंदिन जीवनामध्ये आनंद मिळवण्यासाठी सदैव आनंदी राहावे तसेच राष्ट्रीय ,सामाजिक, शैक्षणिक विषयावर सुखोल कीर्तन करून समाज प्रबोधन केले. यावेळी  कंदले कुटुंबाच्या वतीने ह भ प इंदुरीकर महाराज , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील , जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता  कांबळे, नगराध्यक्ष सचिन  रोचकरी,  युवा नेते विनोद गंगणे, राजसिंहा राजेनिंबाळकर ,नगरसेवक पंडित जगदाळे, किशोर साठे ,औदुंबर कदम, विशाल रोचकरी ,सचिन पाटील ,बापू कणे, नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे  आदी उपस्थित होते, आनंद  कंदले मित्र मंडळ, दयावान भजनी मंडळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
 
Top