जळकोट,दि२ : मेघराज किलजे
पुणे येथील नक्षत्राचं देण काव्य मंचच्यावतीने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२५ व्या संजीवनी समाधी सोहळयानिमित्त आयोजित केलेल्या २२ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील कवी सुरज अंगुले यांनी सादर केलेल्या ' निसर्ग संदेश ' या कवितेस राज्यातून तिसरा क्रमांक मिळाला.सुरज अंगुले यांना मान्यवरांच्या हस्ते नक्षत्र राजज्योतिषरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्यातील कवींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात आळंदी येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, लातूर येथील कायदेतज्ञ मैलारीराज कावळे, नक्षत्राचं देण काव्य मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कार्याध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष डॉ. अभय कुलथे, सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे आदी मान्यवरांच्या हस्ते फेटा, शाल, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी सुरज अंगुले यांचे प्रतिमा काळे(निगडी), प्रीती दबडे(पुणे), प्रतिभा विभुते ( विश्रांतवाडी), गजानन उफाडे, किरण राठोड(पुणे), भाग्यश्री वलसाड( गुजरात), संध्याराणी कोल्हे, निशा खापरे, महादेवी रेणुके, बालाजी पालमपल्ले आदीसह जिल्ह्यातील साहित्यक्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.