जळकोट, दि.२
जळकोट ता. तुळजापूर येथील जय सेवालाल मैदान, बोरमन तांडा येथे मनसे चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन तहसिलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते करण्यात आले . मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे , सरपंच अशोकराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले .
बोरमण तांडा, जळकोट येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेच्या वतीने क्रिकेटप्रेमी युवकांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे . या स्पर्धेचे उद्घाटन करून खेळाडूंना मार्गदर्शन करताना तहसिलदार तांदळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील खेळांडूना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे . अशा स्पर्धांतुन व सरावांतूनच राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू तयार होत असतात . जळकोट ग्रामपंचायतीने ओपन जिमचा रितसर प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडे सादर करावा. त्यासाठी शिफारस करून मंजुरी मिळवून देण्यात येईल .
यावेळी तांदळे यांनी स्वतः फलंदाजी करत तुफान फटकेबाजी केली . याप्रसंगी ईश्वर जाधव, अभिषेक गंगणे, व्यंकट बारदाने, नागनाथ जाधव, विठ्ठल पट्टेवाले, हणमंत अंगुले, आकाश राठोड,लहु चव्हाण, सतीश राठोड ,अमोल राठोड, प्रमोद राठोड, निशांत राठोड, अजय चव्हाण, अंकुश राठोड, किरण राठोड, राणाप्रताप राठोड, अर्जुन जाधव, करण जाधव, लहु राठोड, कुमार चव्हाण, रोहित चव्हाण, सुधाकर राठोड, अमित चव्हाण, समर्थ चव्हाण, अर्जुन चव्हाण, आकाश चव्हाण, शंकर राठोड, समर्थ राठोड, राजु चव्हाण, सुभाष राठोड, बाबु राठोड, आशोक राठोड, अजित कांबळे यांच्यासह जळकोट व बोरमण तांडा येथील नागरिक उपस्थित होते.