तुळजापूर , दि .२

भारतीय गोवंशाची सेवा करणे,त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे,हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून गोसेवा हे पवित्र कार्य असल्याचे मत श्री.पंच दशनाम जूना आखाडा, वाराणसी,उ.प्र  चे तुळजापूर येथील सोमवार गिरी मठाचे महंत ईच्छा गिरी महाराज यांनी व्यक्त केले.

वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंगरूळ ता . तुळजापूर येथे गोशाळा चालवली जाते.वसुबारसच्या निमित्ताने गोशाळेतील गोमातेची पूजा  महंतांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महंत म्हणाले की,भारत हा कृषिप्रधान देश आहे, प्राण्याबद्दल गाई,गुरे,जनावरा बद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.33 प्रकारचे वैज्ञानिक महत्त्व असणाऱ्या गाईला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, तिला आपण मातेचे स्थान दिले आहे.शासनाच्या उदासीनतेमुळे व समाजाच्या दुर्लक्षामुळे गाईंची संख्या कमालीची कमी होत आहे.वात्सल्य संस्थेने 2018 च्या दुष्काळात रामतीर्थ नळदुर्ग येथे 350 गाईंची चालवलेली गोशाळा व मंगरूळ येथे भाकडगाई, अपंग,आजारी,कत्तलखान्यातून सोडवलेल्या गाईंच्या संवर्धनासाठी उभी केलेली कायमस्वरूपी गोशाळा हे कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले .

यावेळी विशेष उपस्थित असलेले सिद्ध गरीबनाथ मठाचे महंत मावजीनाथ महाराज व अरण्य गोवर्धन मठाचे महंत व्यंकटअरण्य महाराज यांनी वात्सल्यच्या माध्यमातून गोवंश संवर्धनासाठी चाललेले प्रयत्न पाहून समाधान व्यक्त केले. 

याप्रसंगी पंचगव्य चिकीत्सा तज्ञ  संजय  सोनवणे,परशुराम पेंदे,गोसेवक अरविंद बनसोडे,प्रवीण म्हमाने,योगेश कोरे,ज्योती यमगर,सुगंधा गावडे,सुंदर यमगर उपस्‍थित होते.
 
Top