चिवरी , दि. २८
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील 18 वर्षे पुढील ग्रामस्थांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गावामध्ये ग्रामपंचायतीकडून कोरोना लसीकरणा विषयी जनजागृती, चर्चासत्र तसेच घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतला 100 टक्के लसीकरण करणे यशस्वी झाली आहे. येथील 18 वर्षे पुढील 2329 नागरिकाचे 100% लसीकरण करण्यात आले आहेत, यासाठी अणदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मल्लय्या स्वामी, सरपंच अशोक घोडके उपसरपंच बालाजी पाटील ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, पोलीस पाटील योगेश बिराजदार, आरोग्य सेवक निखिल डांगे, आरोग्य सेविका सुनिता माने, अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार, उषाबाई नगदे, कल्पना शिंदे रेश्मा चिमणे, लक्ष्मी मेंढापूरे आशा कार्यकर्त्या अर्चना राजमाने राजश्री कांबळे,ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे, संगणक चालक शंकर झिंगरे, कल्याण स्वामी ,धनाजी कोरे आदींनी पुढाकार घेतला होता.