तुळजापूर ,दि . २८ :
शहरात किसान चौकी ते आठवडा बाजार, कणे गल्ली, मटन मार्केट, साळुंके गल्ली या ठिकाणी कचरा कुंडीची सोय करण्याच्या मागणीचे येथील समस्त नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे .
वरिल भागातील कचरा समस्या गंभीर झाली असून या भागात कचराकुंडी नाही तरी अधिकृत कचराकुंडी देण्यात यावे अशी मागणी येथील रहिवाशांनी केली. सदरील निवेदनावर विजयकुमार नवले, बाबासाहेब पेंदे, विवेक इंगळे, विठ्ठल झाडपिडे, शिवाजी क्षिरसागर, तानाजी भोसले, अशोक पेंदे, विजय भोसले, उत्तम अमृतराव, बाळासाहेब नाईकवाडी, देवेंद्र झाडपिडे आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.