जळकोट, दि. ७ :

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन, नगर विकास शिक्षण मंडळ, मुरूमचे अध्यक्ष व उमरगा जनता सहकारी बँकेचे संचालक बापूराव पाटील यांची पाच पीठापैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशातील श्रीशैलम पिठाच्या ट्रस्टवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल जळकोट ता. तुळजापूर येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय व जगज्योती महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, कामगार, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महिला व बाल कल्याण व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार मेघराज किलजे,शिवराज राचेट्टी , संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top