जळकोट, दि.७ :

 तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे वयोवृद्ध व निराधार महिलांना दिवाळी भेट म्हणून साडीचोळी व‌ फराळ  वाटप करण्यात आले.


जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्यावतीने ही भेट देण्यात आली.यावेळी चव्हाण म्हणाले की ,सर्व महिला सक्षम आहेत.पण दिपावली सणानिमित्त त्यांना भेट वस्तू दिल्याने त्यांच्या जीवनात एक नवचैतन्य निर्माण होते.त्यामुळे हा उपक्रम घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.


यावेळी माजी तहसीलदार माणिकराव चव्हाण, सरपंच ज्योतीका चव्हाण, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक नेमिनाथ चव्हाण,नेमिनाथ राठोड, माजी सरपंच सुभाष नाईक, महादेव राठोड, पांडुरंग चव्हाण, सिताराम राठोड, विनायक चव्हाण,थावरू राठोड, शंकर राठोड , शिवाजी चव्हाण,चंचलादेवी चव्हाण, ग्रा.पं.सदस्य रामचंद्र पवार,घमाबाई राठोड,धानाबाई राठोड, शांताबाई राठोड, जयश्री चव्हाण, गोविंद राठोड, मोतीराम राठोड,हरीचंद्र जाधव, रेवाप्पा राठोड, लक्ष्मण राठोड,सुभाष चव्हाण, विजय पवार, संजय राठोड , गणपती राठोड, सुनील चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे‌ शिवाजी राठोड ,महिला  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवाजी नाईक यांनी केले.

 
Top