नळदुर्ग , दि .७


आखिल भारतीय जमियतुल कुरैश संस्था या कुरेशी समाज संस्थेच्या युवा आघाडी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी नळदुर्ग  येथील  कार्यकर्ते अबुबकर मोहम्मदसाहब कुरेशी यांच्या  निवडबद्दल रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया व वाविध संघटनेच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा  देण्यात  आले. 


  
 नळदुर्ग येथील अबु बकर कुरेशी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आँल इंडिया जमीयतुल कुरैश या कुरेशी समाज संस्थेचे युवा आघाडीचे  प्रदेश अध्यक्ष अबु सुफियान कुरेश यांनी  निवडीचे पत्र त्यांना दिले असून त्यांच्या  निवडी बद्दल रिपाइंच्या आल्पसंख्याक आघाडीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष बाशीद कुरेशी , रिपाइं मराठवाडा विभाग कार्यकारणी सदस्य दुर्वास बनसोडे व रिपाइं यूवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करण्यात आला. 
  यावेळी रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड,  रिपाइं युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे ,बबलू कुरेशी, शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ कानडे, दिपक निकाळजे, सामाजिक संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत सुरवसे, तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते जमील कुरेशी, फारुख कुरेशी,गणी बागवान, माजी नगरसेवक सचिन  डुकरे, अँड.शांतीबल कांबळे, अँड.मारुती शिंदे  प्रवीण राठोड,आदीसह कार्यकर्ते   उपस्थित होते.
 
Top