नळदुर्ग , दि .७ :
वात्सल्य सामाजिक संस्थेने निराधार, एकल महिलांसाठी भाऊबीजेचे औचित्य साधून ‘ताईसाठी मायेची शाल’या उपक्रमाची सुरुवात काळेगाव ता . तुळजापूर या गावातून केली.
वात्सल्यचे तुळजापूर आणि परिसरात एकल महिलांमध्ये काम आहे.302 महिलांच्या सर्वेक्षणानंतर 78 एकल भगिनी मध्ये वात्सल्यने काम सुरू केले आहे.समाजातील सूह्रदयी व्यक्तींच्या सहकार्याने या भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प वात्सल्य ने केला आहे.
दिवाळी आपल्या सर्वांचा आनंदाचा, मांगल्याचा सण.दिवाळी नंतर कडक थंडी ही अंगात हुडहुडी भरवते, त्यामुळे दिवाळीतील भाऊबीजेच्या निमित्ताने या एकल भगिनींना सोलापुरी चादर,शाल आणि मिठाईचे वाटप करण्यात आले,या उपक्रमासाठी तुळजापूर येथील एसबीआय चे अधिकारी श्री.बाळासाहेब हंगरगेकर,सोलापूर येथील श्री.संतोष व्हटकर यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी काळेगावचे सरपंच श्री.आनंदराव उंबरे,श्री.अरविंद मुळे, श्री.प्रभाकर जाधव,ग्रामपंचायत सदस्य श्री.अशोक गडदे श्री.सतीश पाटील,श्री.सुधाकर पाटील श्री.अरविंद बनसोडे.श्री.बाळासाहेब गायकवाड,श्री.नितीन रोडे,श्री.प्रवीण साळुंखे,हंगरगेकर कुटुंबीय व एकल भगिनी उपस्थित होत्या.