नळदुर्ग , दि ७ : विलास येडगे
सलग ४३ वर्षे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा करण्याचे शिवशाही तरुण मंडळ व पारायण समितीचे कार्य कौतुकास्पद असुन हे कार्य अखंडपणे सुरू राहावे असे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भिडे गुरुजी यांनी नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे सुरू असलेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भेट दिल्यानंतर बोलतांना म्हटले.
नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे दि.६ नोव्हेंबर पासुन श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली आहे. हा पारायण सोहळा दि.१२ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. पारायण सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.७ नोव्हेंबर रोजी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भिडे गुरुजी यांनीभेट दिली यावेळी त्यांनी श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजनही श्री भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी भिडे गुरुजी यांचे पारायण मंडपात आगमन झाल्यानंतर पारायण समितीचे बलभिमराव मुळे यांनी भिडे गुरुजींचा सत्कार केला.
यावेळी शिवशाही तरुण मंडळाचे सुहास येडगे, तानाजी जाधव, संतोष मुळे, विलास येडगे, नेताजी किल्लेदार, कुरुक्षेत्र किल्लेदार, श्रीकांत सावंत विनोद चौधरी, शिवाजी चौधरी, पांडुरंग गायकवाड, तुकाराम जाधव, आण्णा जाधव, बालाजी किल्लेदार, धनाजी किल्लेदार, सौ. सुभद्रताई मुळे, अमित सुरवसे, उमेश जाधव, बाबुराव सुरवसे, शिवाजी सुरवसे,प्रा. दीपक जगदाळे, नळदुर्ग येथील शिवप्रतिष्ठानचे गजानन कुलकर्णी व त्यांची पुर्ण टीम उपस्थित होते.
यावेळी मार्गदशन करताना श्री भिडे गुरुजी यांनी म्हटले की आज धार्मिक कार्यक्रमाबरोबरच प्रत्येक गावात कुस्तीचे आखाडेही सुरू राहिले पाहिजेत कारण देवकार्याबरोबरच आजची युवा पिढी ही बलदंड राहणे गरजेचे आहे. आशा पारायण सोहळ्यात युवकांनी मोठ्या संख्येने वाचनासाठी बसणे गरजेचे. श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचेही पारायणे गावागावातुन करण्याची आज गरज आहे. धर्म रक्षणासाठी युवकांनी आज पुढे येण्याची गरज आहे असेही शेवटी भिडे गुरुजी यांनी म्हटले.