अणदूर , दि .१५ :
अणदुर ता .तुळजापूर येथील सौ. निकिता धनराज डोलारे( घोडके) यांचा महाराष्ट्र पशु, आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या वतीने डेअरी टेक्नॉलॉजी बी. टेक.पदविका अभ्यासक्रम मध्ये विशेष गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक आल्याबद्दल, गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र आभिनंदन केले जात आहे.
अणदूर येथील शिवसेनेचे बाळकृष्ण घोडके यांच्या स्नुषा सौ निकिता डोलारे(घोडके)या उदगीर येथील कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी या कॉलेज मधून बी. टेक. हा 4.5 वर्षांचा कोर्स, विशेष गुणवत्ते मधून प्रथम क्रमांकाने पास झाल्या होत्या. त्यांचा नागपूर विद्यापीठाने एका विशेष कार्यक्रमात तपस्विनी सावित्रीबाई मेश्राम गोल्ड मेडल देऊन सन्मान केला. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या व विशेष गुणवत्ता प्राप्त मुलींनाच हे गोल्ड मेडल देण्यात येते, नागपुरात झालेल्या विशेष दीक्षांत कार्यक्रमात,दिल्ली येथील औद्योगिक संशोधन परिषद महासंचालक डॉ शेखर मांडे,पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री मंत्री सुनील केदार,विद्यापीठ कुलगुरू डॉ आशिष पातूरकर,कुलसचिव कलत्रे,शिक्षण संचालक डॉ शिरीष उपाध्ये,डॉ प्रशांत वासनिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत,हा सन्मान सौ निकिता यांना प्रदान करण्यात आला.