नळदुर्ग , दि .१७
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे ग्रामस्थ आयोजित आमदार चषक२०२१. आमदार राणाजगजितसिह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या टेनिस क्रिकेट बाॕल स्पर्धेत बजरंग संघ विजेता तर अमोल युवा मंच संघ हा उपविजेता ठरला आहे.
विजेत्याना जि.प.बांधकाम सभापती दत्ता देऊळकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विजेत्या संघाला नंदगाव ग्रामस्थ व संयोजक समितीच्या वतीने ७१ हजार रूपये , प्रकाश घोडके यांच्या तर्फे चषक देण्यात आले. द्वितीय-४१ हजार रूपये शिवपुत्र कलबुर्गी हरिओम मसालेवाले यांच्याकडुन तर चषक युवानेते वैभव पाटील यांच्या तर्फे देण्यात आले.तृतीय पारितोषिक २१ हजार रूपये , गणेश सोनटक्के , बसवराज हालसे यांच्यातर्फे तर चषक सिध्देश्वर कोरे यांच्याकडुन देण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणून ५००० रुपयेचे पारितोषिक सरपंच कलशेट्टी यांच्याकडुन देण्यात आले.या क्रिकेट स्पर्धेत वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडुंना देखिल गावातील क्रिडाप्रेमीनी देखील आकर्षक बक्षिस ठेवले होते.या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला गावचे सरपंच पती श्रध्दानंद कलशेट्टी.यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडले. यावेळी आलेल्या प्रमुख अतिथींचे सत्कार सन्मान संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले.या क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे आभार संयोजक समितीने मानले.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक संयोजक समितीच्या सर्व पदाधिकारी खैळाडु क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.