नळदुर्ग , दि . १७ दिपक जगदाळे
सोलापूर येथील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील शिक्षक राजेंद्रकुमार श्रीमंत नारायणकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे नुकतीच पी. एचडी. प्रदान करण्यात आली आहे. त्यांना बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील वनस्पती विभागातील मार्गदर्शक प्रा डॉ. उद्धव भाले यांचे मार्गदर्शन लाभले.
नारायणकर यांनी "स्टडीज ऑन ऑकरन्स अँड डायवरसीटी ऑफ अरबसकुलार मायकोरायसल फंन्जाय असोसियटेड विथ इंपॉरटंट सिझनल क्रॉप प्लाँट" या विषयावर संसोधन पूर्ण केले आहे. या शेतीविषयक असणाऱ्या संशोधनातून अत्यंत सुक्ष परजीवी बुरशी ही अन्नधान्य पुरविणाऱ्या पिकाना कशा प्रकारे सेंद्रिययुक्त उपयुक्तता निर्माण करते व त्यामुळे पिकाची वाढ हाेऊन उत्पादन क्षमता वाढण्यास कशाप्रकारची मदत होऊ शकते, अशाप्रकारचे शेतकऱ्यांना उपयोगात येणारे संशोधन पूर्ण केले आहे. प्रा.डॉ.यु. एन. भाले यांच्याकडे अशाप्रकारचे सातत्याने संशोधन केले जात आहे. त्यामुळे त्यांचे व नारायणकर यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतूक होत आहे.