मंगरूळ , दि .१७ : 

समाजातील गरजू एकल महिलांमध्ये वात्सल्य संस्थेचे काम दखलपात्र ठरत असून महिलांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन तहसिलदार तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापिका श्रीमती योगिता कोल्हे यांनी केले.


रोटरी सेवा ट्रस्ट व रोटरी क्लब उस्मानाबादच्या सहकार्याने वात्सल्य सामाजिक संस्थेने 12 गरजु महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले.

याप्रसंगी श्रीमती कोल्हे  म्हणाल्या की,  महिला ही फक्त चूल व मूल या दोन गोष्टीतच मर्यादित नसून पुरुषांच्या बरोबरीने ती सर्व क्षेत्रात काम करत आहे.वात्सल्य सामाजिक संस्थेने मंगरूळ ता .तुळजापूर आणि परिसरातील गरजवंत महिलांना स्वावलंबी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून सर्व महिलांनी याचा फायदा घ्यावा.

सोलापूरच्या रोटेरियन श्रीमती लता चन्ना यांनी या सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण व संस्थेने या महिलांनी उत्पादित केलेल्या साहित्याला बाजार मूल्य मिळवून देण्याचा केलेला निश्चय नक्कीच कौतुकास्पद आहे असे त्या म्हणाल्या.

सुरुवातीला श्रीमती कोल्हे यांनी संस्थेच्या माध्यमातून चाललेल्या सर्व उपक्रमांची पाहणी केली,संस्थेच्या भुजंगराव घुगे स्मृती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कसई, काळेगाव, आरळी,कोरेवाडी, यमगरवाडी, मंगरूळ,गावातून आलेल्या 12 गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.
 
Top