जळकोट,दि.१६
आजचा युवक व्यसनाधीन होत चालला असून, युवकांना एकत्रित करून बदलत्या गरजेनुसार उद्योग व्यवसायाला चालना देऊन युवकांच्या माध्यमातून अर्थकारणाला गती द्यावी. असे प्रतिपादन पत्रकार व श्रीगणेश कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष मेघराज किलजे यांनी केले.
जळकोट येथील प्रयाग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सोसायटी कार्यालयात ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलताना मेघराज किलजे हे बोलत होते. प्रयोग मल्टीस्टेटच्यावतीने पत्रकार मेघराज किलजे, विरभद्र पिसे, निजाम शेख, अरुण लोखंडे व सुनील माळगे या पत्रकारांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मेघराज किलजे म्हणाले की, जळकोट हे गाव मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. गावातील युवकांना एकत्रित करून भावी काळातील संधी शोधून उद्योगधंदे वाढवण्यासाठी प्रयागने अर्थचक्र फिरवले पाहिजे. यासाठी युवकामधूनच उद्योगाच्या संधी शोधल्या पाहिजेत. उद्योगाचे एक व्हिजन निर्माण करावे. प्रयाग मल्टीस्टेटने सुरु केलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचे यावेळी कौतुक केले.
यावेळी प्रयाग मल्टीस्टेटचे चेअरमन ऍड. सचिन कदम, ब्रह्मानंद कदम,डॉ. संजय कदम, संचालक ताजुद्दीन शेख, प्रमोद सावंत, विशाल जाधव, अमोल पट्टेवाले, औदुंबर भोगे, पवन जाधव, महादेव पवार, श्रद्धानंद स्वामी, धनंजय मडोळे, मंगेश सुरवसे, शरद पवार, सोसायटीचे कर्मचारी पांडुरंग साखरे, संचालक मंडळ, युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश कलाल यांनी तर आभार ब्रमानंद कदम यांनी मानले.