तामलवाडी:-दि २८
सरस्वती विद्यालय तामलवाडी ता. तुळजापूर येथील क्रीडाशिक्षक तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रभाकर जाधव यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच सोलापूर येथील कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय चर्मकार शिक्षक महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .या कार्यक्रम प्रसंगी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक लामतुरे, सी .के. मुरळीकर, सुरेखाताई लामतुरे, प्रदेश युवक अध्यक्ष नितीन शेरखाने, प्रदेश कार्याध्यक्ष संजय बाबा शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मधुकर गवळी, प्रदेश कोषाध्यक्ष राम कबाडे, जिल्हाध्यक्ष अजय राऊत, चर्मकार शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ ,गणेश तूपसमुद्रे, भैरवनाथ कानडे ,सोमनाथ बनसोडे, नगरसेविका संगीता जाधव यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.