उस्मानाबाद , दि . ३१

जिल्ह्यातील मोजक्या पर्यटन स्थळांपैकी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी परिसरातील रामलिंग पर्यटन स्थळाचा परिसर सध्या बेजबाबदार नागरिकांमुळे अस्वच्छ झालेला आहे , कचरा, प्लॅस्टिक ,पत्रावळ्या , बिस्किटांचे कव्हर ,प्लास्टिक बाॅटल्स ,दारु बाॅटल्स अशा अन्य वस्तुंमुळे सुंदर अस जंगल हळु हळु विद्रुप होत चाललेल आहे.

नविन वर्षाच्या सुरवातीला उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख असलेल्या या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवुन या पुढेही रामलिंग पर्यटन स्थळ नेहमी स्वच्छ आणी सुंदर राहण्यासाठी MH 25 Helping Hands प्रयत्नशिल राहनार आहे अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे

 स्वच्छता मोहीम दि. 2 जानेवारी 2022 , वार रविवार रोजी सकाळी 11 ते 4 या वेळत covid-19 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांच्या उपस्थित ही मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांना संस्थेच्या वतीने टी-शर्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 
Top