उस्मानाबाद नगरपालिकेच्या प्रशासकपदी नेमणूक झालेल्या मुख्याधिकारी येलगटे यांचा सत्कार राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी केला.
विद्यमान नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूराजे निंबाळकर यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर उस्मानाबाद नगरपालिकेच्या प्रशासकपदी मुख्य अधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांची नियुक्ती झाली आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांची निवडणूक होईपर्यंत उस्मानाबादकरांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही सत्कारानंतर हरीकल्याण येलगट्टे यांनी दिली आहे.