जळकोट,दि.३१:
मनोहर पर्रीकर क्रीडासंकुल मडगाव, गोवा येथे दि. २६ ते ३० डिसेंबर २१ या कालावधीत पार पडलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद सिकई मार्शल आर्ट स्पर्धा पार पडल्या. यामध्ये देश पातळीवरील गोवा, महाराष्ट्र जम्मू- कश्मीर, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार ,पंजाब ,हरियाणा ,मध्य प्रदेश ,तामिळनाडू इतर असे २७ राज्यांनी सहभाग घेतला .
या स्पर्धेत विराज विक्रम पाचंगे एरोसिकई या ग्रुप खेळामध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. विराज पाचंगे याची निवड आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी झाली असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या क्रीडा प्रकारांचे एरोसिकई असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष मजहर खान ,सचिव रवींद्र गायकी, मुख्य प्रशिक्षक महमदरफी शेख यांचे मार्गदर्शन लाभले .