काटी , दि . ३१
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणपत श्रीपती चिवरे तर उपाध्यक्षपदी सुनिल दत्तात्रय गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अहमद सय्यद यांनी समितीची रचना व कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत कदम यांनी केले व आभार सहशिक्षिका श्रीमती संगीता सुरवसे यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक वृंद आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते.