जळकोट,दि.३१ : मेघराज किलजे
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शहापूर ता .तुळजापूर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्करराव सुरवसे, गोरे उमांकात, सरपंच, प्रदीप काळे ,उपसरपंच , पवार भिमराव , पाडूरंग मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून पालक सभेला सुरुवात झाली.
प्रास्ताविक मुख्याध्यापक राठोड डी. यू यांनी करून पालक सभेचे औचित्य स्पष्ट केले आणि पालक सभेची रचना शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य स्पष्ट केले. रचनेनुसार शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड करण्याचे आवाहन केले . यावेळी पालकांनी चर्चा व विचारविनिमय करुन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना केली. नूतन शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारींची निवड पालकसभेत सर्वसंमत्तीने करण्यात आली. शिदे मुकूंद विश्वनाथ अध्यक्ष तर सौ. बालिका ईश्वर पवार, उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी नानासाहेब दिलीप पाटील (ग्रामपंचायत सदस्य), पालक सदस्य श्रीमती रईसा असिर पटेल, तांदळे विष्णू बाबूराव, सोमवसे चंद्रसेन विश्वनाथ , सौ. डावरे मिनाबाई दिपक, जगताप अरविंद मनोहर, सौ. कोळी भाग्यश्री हरिश्चंद्र, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती. इनामदार अस्मतबानू मन्सूरअली ,सदस्य सचिव मुख्याध्यापक राठोड ङि यू . यांची निवड करण्यात आली .
पालक सभेत येऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांची निवड जाहीर करण्यात आली. नंतर शाळेचे मुख्याध्यापक राठोड यांनी नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पालक सभेत नूतन अध्यक्ष व पालक सभेचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले .शेवटी मुख्याध्यापक राठोड यांनी उपस्थितताचे आभार मानले. या पालक सभेचे सूत्रसंचालन जाधव अभयसिह यांनी केले .ही पालक सभा यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक मगतराव , पवार पी. व्ही, कोळी एच . आर., होगाडे शिवाजी, श्रीमती शिदे अर्चना, श्रीमती सुर्यवंशी संगीता या शिक्षकांनी तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी स्वामी धोडगे यांनी परिश्रम घेतले. या पालक सभेस गावातील जेष्ठ नागरिक ,पालक , माता-पालक उपस्थित होते .