नळदुर्ग , दि . ३१ 


तुळजापूर तालुक्यातील आणदुर येथिल जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन व ग्रामीण पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जय मल्हार पत्रकार संघ  अणदुर यांच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून जय मल्हार पत्रकार संघाचे २०२२ दिनदर्शिका प्रकाशन व ग्रामीण पत्रकार बांधवांचा पुरस्कार सन्मान सोहळा ६ जानेवारी २०२२ रोजी आणदुर येथील हुतात्मा स्मारक मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे .

 
 दिनदर्शिका प्रकाशन व ग्रामीण पत्रकार बांधवांचे पुरस्कार सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर , सरपंच रामचंद्र आलुरे ,  उपसंपादक प्रशांत जोशी , श्री श्री रविशंकर विद्या मंदिर अणदुरचे संस्थापक डॉक्टर जितेंद्र कानडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती पत्रकार सन्मान सोहळा संयोजक समितीने दिली आहे .

जय मल्हार पत्रकार संघ आणदूर यांच्यावतीने वर्षभर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले  जातात . तर कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात कोरोनाच्या नियमांचे पालन जनतेने करून शासनास सहकार्य करा कोरोनास हद्दपार करा या संदर्भात कलापथकाच्या माध्यमातून जय मल्हार पत्रकार पत्रकार संघाने गाव शहर वाड्या वस्तीत जाऊन प्रबोधन केली आहे . 


आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा तुळजापूर तालुक्यातील पत्रकारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top