नळदुर्ग , दि . ३१
रेशन दुकानसंबंधी माहिती अधिकारात मागणी केल्याने संबंधीत स्वस्त धान्य दुकान चालकाने आर. टी. आय कार्यकर्त्यास जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची निवेदनाद्वारे उस्मानाबाद पोलीस अधीक्षकाकडे तक्रार करून संबंधीत धान्य दुकानदारावर कार्यवाही करण्याची मागणी गुळहळळी ता. तुळजापूर येथील योगेश आनंद हांजगे यांनी केली आहे.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, योगेश हांजगे यांनी दि. 08 ऑक्टोबर रोजी जनहितमाहिती अधिकारी तथा, नायब तहसिलदार (पु.) तुळजापूर यांच्याकडे माहिती अधिकारात मौजे गुळहळ्ळी येथील स्वस्त धान्य दुकानांशी संलग्नित माहिती मागीतली होती. सदर माहिती हि धान्य दुकानदाराकडून परस्पर हस्तगत करण्याचे तहसिल कार्यालयाकडून हांजगे यांना कळविण्यात आले. त्यावरून योगेश हांजगे यांनी रेशन दुकानदार यांच्याकडे माहिती घेण्यासाठी दि. 20 ते 24 डिसेंबर रोजी या कालावधीत स्वस्त धान्य दुकान उघडण्याच्या वेळेत माहिती घेण्यासाठी गेले असता संबंधित दुकान पाचही दिवस बंद असल्याचे म्हटले आहे.
दि. 27 डिसेंबर रोजी त्यांनी पुन्हा माहिती मागण्यासाठी दुकानदाराकडे गेले असता संबंधीतांना तहसिल कार्यालयाचे पत्र दाखविले. त्यांनी हांजगे यांना सांगितले की संबधीत माहिती ही दुकानात नाही. घरी आहे असे सांगीतले व माहिती घेण्यासाठी उद्या येण्याचे सांगीतले. यावेळी हांजगे यानी त्यांना अभिप्राय वही मागीतले असता ते ही घरी आहे असे सांगीतले. दि. 28 डिसेंबर रोजी माहिती मागण्यासाठी सदरील दुकानात गेलो असता, संबंधीतास माहिती मागितली असता हांजगे यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांनी जिवे मारतो असे धमकावले. मी मरेपर्यंत तुला ठेवणार नाही गावात तुमचे घरे बोटावर मोजण्या इतके घरे आहेत, तुला बघयाचे आहे का? माझी काय ताकद आहे ते, असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली. माहिती देणार नाही तुला काय करायचे करुन घे असे म्हटले.
निवेदनाची प्रत तुळजापूर तहसिलदार , नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक याना देण्यात आले आहे.