मंगरूळ , दि . ०१

वात्सल्य सामाजिक संस्था व कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगरूळ व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा , चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील कार्यक्रम वात्सल्य सामाजिक संस्थेच्या मंगरूळ येथील भुजंगराव घुगे स्मृती सभागृहात मंगळवार  दि.4-1-2022 रोजी  सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.



सेंद्रिय शेती,जमिनीची समस्या व उपाय,रब्बी पिकातील कीड रोग व्यवस्थापन,शेतीतील कमी खर्चाचे तंत्रज्ञान,या विषयावर प्रा. लालासाहेब देशमुख ,  ए.एन.जाधव, डॉ. भगवान अरबाड, डॉ. श्रीकृष्ण झगडे, श्रीमती अपेक्षा कसबे  या लातूर व तुळजापूर येथील शेती तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून सदरील कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यास प्रथम नोंदणी, प्रथम प्राधान्य असून नाव नोंदणी बंधनकारक आहे.  असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
 
Top