तुळजापूर , दि . ०१
तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या हस्ते तुळजापूर तालुका प्रसिध्दी प्रमुखपदी जुबेर शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी पुष्पगुच्छ व नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव संजय गायकवाड, जिल्हा संपर्कप्रमुख मनोज जाधव , तुळजापूर तालुकाध्यक्ष चाॅद शेख, तालुका उपाध्यक्ष प्रतिक भोसले, रूपेश डोलारे, बालाजी गायकवाड, शहराध्यक्ष शुभम कदम तसेच सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पाहुणे म्हणून वसंत कांबळे,कालिदास जानराव, अशोक खारे, राजवर्धन निकम,प्रविन लोकरे व पदाधिकारी उपस्थित होते.