नळदुर्ग ,दि . १९  :

छञपती शिवाजी महाराज पुतळा अवमान प्रकरणी नळदुर्ग शहर शिवसेनेच्या वतीने रविवार दि. १९ डिसेंबर रोजी  महामार्गावर  कर्नाटक   मुख्यमञ्यांच्या पुतळ्यास शिवसैनिकानी नळदुर्ग येथे  जोडे मारुन  निषेध व्यक्त केला.


कर्नाटकच्या राजधानी बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी  महाराजांचा अवमान करुन  शिवप्रेमीं  नागरिकांच्या भावना दुखावल्या. या प्रकरणी  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याने ही क्षुल्लक बाब आहे असे विधान केले. याच्या निषेधार्थ चावडी चौक ते एसटी स्टँड पर्यंत शिवसैनिकानी  निषेध मोर्चा काढला. या मोर्च्याचे रुपांतर सभेत होऊन कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला जोडे मारुन या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आले.


यावेळी  उस्मानाबाद  जिल्ह्याचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर  चव्हाण, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, माजी तालुका प्रमुख बाळकृष्ण घोडके पाटील, उपतालुकाप्रमुख  कृष्णात  मोरे, नेताजी महाबोले यांनी  निषेध व्यक्त केला. यावेळी जळकोट ता. तुळजापूर येथिल  तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंतराव पाटील, उपशहरप्रमुख शाम कनकधर, भिमा कोळी, होर्टीचे प्रसाद भोसले,युवासेना शहरप्रमुख मयूर हुलगे, युवानेते रवी पिस्के, ओंकार कलशेट्टी, सुर्यकांत घोडके,कल्लपा कांबळे व नळदुर्ग,अणदूर,जळकोट, व होर्टीचे शिवसैनिक उपस्थित होते.
 
Top