.
उमरगा , दि . १८ : लक्ष्मण पवार
उमरगा तालुक्यातील अचलबेट देवस्थान येथे श्री दत्त जयंती महोत्सव वैराग्यमुर्ती उज्वलानद महाराज यांच्या अपर॑पार भक्ती रसाने गेले 45 वर्षापासून श्री दत्त जयंती साजरी केली जाते आहे.
दोन दिवसीय कार्यक्रमात शुक्रवारी सायंकाळी 5 वा. हभप. ज्ञानदेव सुर्यवंशी गुरूजी यांचे प्रवचन संपन्न झाले. तदनंतर सायंकाळी 7 ते 9 या वेळेत वेदांताचार्य ह.भ.प. जयवंत बोधले महाराज पंढरपूर यांचे हरी किर्तन संपन्न झाले.
शनिवारी सकाळी 9 वा गुरुचरित्र पारायण समारोप, 10 वा. हभप. हेबाडे गुरूजी अचलबेट देवस्थान यांचे प्रवचन दिवसभरात स॑गीतभजन झाले.
सायंकाळी 4-30 ते 5-30 या वेळेत श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान चे हभप. हरी गुरूजी लवटे महाराज यांचे प्रवचन होऊन तदनंतर सूर्यास्ताच्या वेळी श्री दत्त जयंती गुलाल व पुष्पवर्षावाने महोत्सवाची सांगता झाली.
हा दोन दिवशीय महोत्सव यशस्वीतेसाठी अचलबेट देवस्थान भक्त परिवार यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले आहेत.
प्रवचनात मार्गदर्शन करताना हभप. हरी गुरूजी लवटे महाराज म्हणाले की, संसार रूपी जीवनातून मुक्त होण्यासाठी ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा यांना अंगीकार करून जीवनाचे सार्थक करावे असे आवाहन केले.