तुळजापूर , दि . १९ : 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी  श्री .तुळजाभवानी  देवीस  नाशिक येथील एका महिला देवी भक्ताने‎ तीन तोळे सोन्याचे लक्ष्मीहार,‎ कानातले, मनी मंगळसूत्र व नथ अर्पण केली. यावेळी मंदीर संस्थानच्या वतीने भाविकांचा सत्कार  करण्यात आला .

नाशिक  येथिल राहणा-या मनीषा‎ अनिल वाळुंज   या महिला देवी भक्ताचे‎ नाव आहे. शनिवार दि.१८ डिसेंबर रोजी  श्री . तुळजाभवानी देविस  लक्ष्मीहार व इतर सोन्याचे‎ दागिने अर्पण करण्यात आले. मंदिर संस्थानच्या‎ वतीने देवीभक्त मनीषा अनिल वाळुंज यांचा धार्मिक‎ व्यवस्थापक नागेश शितोळे यांनी मातेची साडी,‎ प्रसाद, फोटो व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी‎ पुजारी सौरभ छत्रे यांच्यासह विश्वास कदम, शंकर‎ शिंदे, रवी गायकवाड, सत्यजित वाघे आदी मंदिर‎ संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.‎

.‎
 
Top