मुरुम , दि . १९
जिल्हा परिषद कन्या हायस्कुल मुरूम ता. उमरगा येथिल शाळेत जेष्ठ साहित्यिक भाऊराव सोमवंशी, सेवानिवृत्त प्राचार्य सच्चिदानंद अंबर ,मुख्याध्यापक बालाजी गाडेकर , डॉ वंदना जाधव, श्रीमती मंकावती कांबळे, श्रीमती अरुणा दुगम,श्री.घाटवाले नुरअहमद, रूपचंद ख्याडे , ब्रम्हानंद कडते, महादेव कुनाळे यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
महामानव महाकाव्यग्रँथा मध्ये तीन पिढीतील 2021 कवितांचे संपादन करण्यात आलेले असून हा काव्यग्रँथ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील भारतील सर्वात मोठा संपादित महाकाव्यग्रंथ आहे. या महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन राज्यातील 25 जिल्हाधिकरी आणि 11 विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते दि.20 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या कार्यालयात संपन्न झाले.हा महाकाव्यग्रंथ सामाजिक अभिसरणातील महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.
कवी,लेखक, अभ्यासक यासाठी हा महामानव महाकाव्यग्रंथ उपयोगी पडणार आहे. 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड' रेकॉर्ड मध्ये नोंद होणाऱ्या आणि मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथात डॉ. वंदना जाधव यांच्या कवितेचा समावेश आहे.
यावेळी डॉ. वंदना जाधव यांचा सत्कार जेष्ठ साहित्यिक भाऊराव सोमंवशी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रुपचंद ख्याडे यांचा क्रांतिरत्न महाग्रंथात लेखाबद्दल सत्कार करण्यात आला . यामुळे साहित्यिक सोमवंशी यांनी डॉ वंदना जाधव व रूपचंद ख्याडे यांच्या साहित्याचे कौतुक केले. तसेच त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांमधून साहित्यिक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंकावती कांबळे यांनी तर आभार श्रीमती अरुणा दुगम यांनी मानले.