.

होर्टी , दि . ०३  बाळकृष्ण मुळे

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व श्री राम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 


अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अभिषेक,माऊली पूजा,ज्ञानेश्वरी वाचन, महिला भजन,श्री राम कथा, भजन, हरिपाठ,हरिजागर,काकडा आरती, 
ग्रामदैवत श्री शिवलिंगेश्वर महाराज यात्रा महोत्सवाची सांगता उत्साहात झाली.  सात दिवस चाललेल्या या यात्रा महोत्सवात शांततेची परंपरा कायम आबाधित राहिल्याने परिसरातील  भक्तांनी व यात्रेकरूनी यात्रेला हजेरी लावली. भक्तांनी श्रींच्या चरणी लीन होऊन आनंद द्विगुणित करीत यात्रेचा आनंद घेतला. शिवलिंगेश्वर यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. 

यामध्ये पैलवान मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहण्यास मिळाली दि. 2 रोजी घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. तसेच कुस्त्या पाहण्याची कुस्तीप्रेमींना संधी मिळाली. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन दुपारी 3 वाजता गावकऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच या ठिकाणी लहान मुलांच्या कुस्त्या चांगल्याच रंगल्या होत्या. कुस्त्यांमध्ये बीड, लातूर, उस्मानाबाद येथील नामवंत पैलवानांची उपस्थिती होती.

पैलवानांची लढत रंगतदार झाली. डोळ्यांचे पारणे फेडणारे प्रेक्षणीय सामन्यांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. 


या कुस्ती स्पर्धेमध्ये 100, 500, 1000, 1500, 2000, 3000,  5001/- आखाड्यातील शेवटची कुस्ती ही सुनील मालक चव्हाण यांच्याकडून 11000/- रुपयांची व कृष्णाथ  मोरे यांच्याकडून आकरा हजार रुपये अशा दोन कुस्त्या लावण्यात आल्या. पै.आकाश भोसले होर्टी व माळी रामलिंग मुदगड यांच्यामध्ये लढत झाली.

हलगीने वाढविली कुस्तींमध्ये रंगत

तालुक्यातील होर्टी येथे श्री. शिवलिंगेश्वर यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.व्यंकट भोसले यांच्या शेतात कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये  या कुस्ती दंगलींमध्ये अनेक जिल्ह्यातील पैलवान आपले कसब दाखवीत होते. दरम्यान हलगीच्या तालावर पैलवानांचा देखील उत्साह संचारला होता. कुस्ती म्हटली म्हणजे हलगी आली. कुस्त्यांमध्ये जसजशी चुरस वाढत होती. तसे तसे हलगीच्या ताल कुस्तींपटूंमध्ये उत्साहत संचारत होता. त्यामुळे हलगीने कुस्तींमध्ये रंगत वाढविली होती. चित्तथरारक सामने पाहण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विविध गावचे हजारों कुस्ती प्रेमीं उपस्थित होते.

सात दिवसीय शिवलिंगेश्वर यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता

शिवलिंगेश्वर यात्रेनिमित्त परिसरातील भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवलिंगेश्वर महाराज यांच्या पालखीची मिरवणूक वाजत गाजत गावातून काढण्यात आली शिवलिंगेश्वर च्या जयघोषाने होरटी नगरी दणाणून गेली होती पालखीचे ठीक ठिकाणी दर्शन घेतले शोभेची दारू उडवून पालखीचे स्वागत करण्यात आले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते श्री शिवलिंगेश्वर यात्रेनिमित्त परंपरागत चालत आलेल्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धा हे मुख्य आकर्षण होय.गुरुवार 2 रोजी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली यावेळी उपस्थित संदीप शेळके माजी पं.स.सदस्य औसा, बजरंग दादा सोनवणे लातूर,दयानंद साळुंखे, आदीजन ग्रामस्थांनी व आदी भक्त मंडळीनी सात दिवशीय यात्रोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
 
Top