लोहगाव , दि . ०३ 

        
जनशुभदा फाउंडेशन  महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे गुरूवार (दि.०२)रोजी तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा गौरव  करण्यात आले.

लोहगाव येथे जनशुभदा फाउंडेशन संस्थेचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी उस्मानाबाद कळंब तालुक्याचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देवून पुरस्काराने  गौरव करण्यात आले. यावेळी  शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख कमलाकर चव्हाण,तालुकाप्रमुख जग्गनाथ गवळी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गुड्डे , आधुनिक लहुजी शक्ति सेनेच्या प्रदेश अध्यक्षा नागिनी सोमनाथ कांबळे,शेतकरी संघटनेचे अमोल हिपरगे,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, युवा सेनेचे ज्ञानेश्वर घोडके, राम गायकवाड आदीची प्रमुख उपस्थिती होती.

 आदर्श पञकार पुरस्काराने 

  पत्रकार सतिश राठोड,(खुदावाडी, एस के गायकवाड,(वागदरी) निजाम शेख (लोहगाव) किशोर धुमाळ (वागदरी ) , शाम नागिले (नंदगाव)  यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 तसेच आदर्श शिक्षक दगडू जोडभावे,जनाबाई वाघमारे, किसन जवळगे,मनोज चौधरी यांना तर समाजसेवक वैभव पाटिल,मल्लीनाथ गुड्डे,राम जवान,अशोक घोडके, कोविड योध्दा संतोष घोडके,विद्या बिराजदार,मंगल कापसे,युवा उद्योजक सुनिल घोडके,रणराघीणी नगीनाताई सोमनाथ कांबळे, उत्कृष्ट सरपंच लोचना दबडे,पद्माकर पाटिल,कविता गायकवाड, सिध्दराम धर्मसाले, यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी युवा सेना उपतालुका प्रमुख सुनील कदम, राष्ट्रवादी  युवक कार्यकारणी सदस्य नागनाथ पाटिल,रविंद्र उपसरपंच प्रशांत देशमुख , राजेंद्र जाधव,यांच्यासह  नंदगाव जिल्हा परिषद गटातील सरपंच सामाजिक कार्यकर्ते शिक्षक , कोव्हिड योध्दे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन व प्रस्ताविक प्रा.संतोष पवार तर आभार निजाम शेख यांनी मानले.
 
Top