नळदुर्ग, दि .०३ : विलास येडगे
मराठा गल्ली येथील अर्धवट राहिलेले रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करावे या मागणीसाठी मराठा गल्ली येथील नागरीक दि.३ डिसेंबर रोजी नळदुर्ग नगरपालिकेच्या कार्यालयासमोर एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला आजी- माजी नगरसेवक, शहर भाजप, मनसे यासह अनेक संघटना व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
वारंवार आश्वासन देऊनही नगरपालिकेने मराठा गल्ली येथील रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम पुर्ण केले नाही याबद्दल न.प.प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करीत मराठा गल्ली येथील महिला व पुरुष दि.३ डिसेंबर रोजी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. नागरीक पावसात उपोषणास बसलेले असताना या उपोषणस्थळी ना नगराध्यक्ष फिरकले ना न.प.चा मुख्याधिकारी , त्यामुळे नागरीकांमधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
शिवशाही तरुण मंडळाचे अध्यक्ष पंकज हजारे, सुहास येडगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, सोसायटीचे संचालक सुरेश हजारे, संतोष मुळे,शिवाजी सुरवसे, अमोल सुरवसे, तानाजी जाधव, खंडू जगताप,तानाजी सावंत,अभिजित सावंत, अविनाश जाधव, नितीन जाधव,प्रशांत पवार,विमलबाई काळे कांताबाई जगताप,प्रीती येडगे, मंगलबाई सावंत, सुधामती सावंत,राणी शिवाजी सुरवसे,संगीता जगताप हे न.प.कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.
उपोषण सुरू असताना न.प.च्या बांधकाम समितीचे सभापती बसवराज धरणे, नगरसेवक मुश्ताक कुरेशी,माजी नगरसेवक संजय बताले, सचिन डुकरे,, मनसेचे जिल्हा सरचिटणीस जोतिबा येडगे, शहर भाजपाचे अध्यक्ष पद्माकर घोडके,मनसेचे शहर चिटणीस प्रमोद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव,अमर भाळे, गणेश मोरडे,युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, दयानंद स्वामी, शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख बंडप्पा कसेकर,यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणाला पाठिंबा दिला.
येत्या चार दिवसात या अर्धवट रस्त्याचे काम सुरू केले नाही तर नगरपालिकेवर गाढव मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी मराठा गल्ली येथील नागरीकांनी दिला आहे.