अणदूर , दि . ०३


" मनुष्य हा कधीच सेवानिवृत्त होत नाही,काही ना काही कार्यक्रम त्याचे चालूच असतात, त्याच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते, त्याचा उपयोग समाजासाठी करणे गरजेचे असून, त्यांना पुरस्कार देऊन अणदूरकर सामाजिक संस्थेने समाजकार्यासाठी त्यांना प्रवर्त केले आहे ही खूप छान गोष्ट आहे." असे प्रतिपादन सोलापूर आकाशवाणीचे निवेदक अभिराम सराफ यांनी केले.


ते अणदूर ता .तुळजापूर येथे, दत्तात्रय अणदूरकर सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित आदर्श सेवानिवृत्त शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे, हे होते तर खुदावाडीचे,समाजसेवक डॉ सिद्रामपा खजुरे, व संस्थेचे कोषाध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी ,अध्यक्ष श्रीकांत अणदूरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी श्रीमंत मुळे गुरुजी, श्रीमती शशिकला पाटील, व नागेंद्र भिक्यागोळू यांचा सेवानिवृत्ती नंतर करीत असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते आदर्श सेवानिवृत्त शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळीपुढे बोलताना अभिराम सराफ म्हणाले की, 60 वर्ष वयानंतर मनुष्याने आनंदाने उर्वरित आयुष्य जगावे आनंद आपल्या आत मधेच शोधावा ,आपली ऊर्जा तरुणांना द्यावी, त्यातून एक सुदृढ समाज निर्माण होईल.

 यावेळी डॉ खजुरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून संपूर्ण जिल्ह्यात सेवानिवृत्ती नंतर पुरस्कार देणारी एकमेव संस्था असल्याचे सांगितले. यावेळी शशिकला पाटील व श्रीमंत मुळे या सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव सीमा जोशी यांनी केले, सन्मान पत्राचे वाचन शिवशंकर तिरगुळे यांनी तर अध्यक्षीय सरपंच रामचंद्र आलूरे यांनी केले, तर सूत्रसंचालन एम.बी. बिराजदार व आभार दयानंद काळुंके यांनी मानले .कार्यक्रमास दिनकरराव कुलकर्णी, मधुकर बंदपट्टे, अविनाश मोकाशे, अनिता मुदकांना,मारुती खोबरे, बबन कंदले डॉ रुपाली कानडे, सरिता मोकाशे, डॉ जितेंद्र कानडे, डॉ नागनाथ कुंभार आदी मान्यवरांसह पत्रकार, व्यापारी ,प्रभात मंडळाचे सदस्य,महिला,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top