तासगांव,  दि . १७  : वाचन हा मानवी जीवनाचा व आयुष्याचा सर्वांगींण प्रगतीचा मूलभूत घटक असून वाचन हे ज्ञानार्जनाचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. वाचनाने प्रगतीची दारे खुली होऊन विचारांची, मनाची सकारात्मक मानसिकता, सामाजिक जाणीवेची भावना वाढीस लागते. 


वाचन संस्कृतीमुळेच सर्वसमावेशक बौद्धिक प्रगल्भता वाढते, असे विचार पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथील राज्यशास्त्र विभाग व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मुरुम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रोफेसर डॉ. महेशकुमार मोटे यांनी प्रमुख अतिथी म्हणून प्रेरणादायी विचार मांडले. 



या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सायबण्णा घोडके यांनी वाचन ही जीवनभर पुरणारी ज्ञान शिदोरी असून आनंदी जीवनासाठी वाचन संस्कृतीची जोपासना केली पाहिजे, असे मत मांडले. या  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलींद हुजरे यांनी वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो, मेंदूला चालना मिळते, प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी नवनवीन ज्ञानाच्या प्राप्तीसाठी, नैराश्यावर मात करून अंतर्मनाची शांतता वाढीसाठी वाचनाची नितांत गरज आहे, असे मौलिक विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डी. वाय. साखरे यांनी केले तर आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विजयसिंह जाधव यांनी मानले या कार्यक्रमासाठी विविध विभागाचे विभागप्रमुख, सर्व गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top