काटी , दि . १८ 

तुळजापूर तालुक्यातील काटीच्या कन्या सौ.शामल शिंदे व सावरगावचे सुपुत्र प्रा.माणिकराव शिंदे या दांपत्त्याला ह्युमन राईट्स फाऊंडेशन व रिपब्लिकन मायनाॅरिटी फेडरेशन ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने नुकताच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते आदर्श मातापिता पुरस्काराने गौरविण्यात आले.


 या कार्यक्रमात क्रीडा, पोलीस, आरोग्य, शैक्षणिक, व्यसायिक, सांस्कृतिक,समाजसेवक आदी  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तसेच आदर्श मातापिता अशा मान्यवरांचा सत्कार जिल्हा क्रिडाधिकारी राजेश बागुल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सौ. शामल शिंदे या ताथवडे येथील जेएसपीएमचे ब्लासम पब्लिक स्कूल येथे क्रिडा शिक्षिका तर  त्यांचे पती प्रा.माणिकराव शिंदे हे प्राध्यापक असून प्रा. माणिकराव शिंदे हे आठ वर्षापुर्वीच सेवानिवृत्त झाले. या पती-पत्नीने अहंकार सोडून एकमेकांना समजून घेत खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन घडवत खेड्यातून जाऊन पुण्यासारख्या शहरात जात इतर मातापित्यांना स्फुर्तिदायक व आदर्शवत ठरेल अशी जीवनशैली व कार्य करुन आपला प्रापंचिक गाडा चालवत सौ. शामल शिंदे यांनी आईची तर प्रा. माणिकराव शिंदे यांनी पित्याची भूमिका चोखपणे बजावत आपल्या दोन्ही मुलांना चांगले संस्कार देत उच्चशिक्षित करुन त्यांच्या पायावर उभे केले. 


त्यांची तुषार व धिरज ही दोन्ही मुले एम.बी.ए. असून त्यांच्या दोन्ही सुना इंजिनिअर आहेत. तुषार व धिरज यांनी GTS Technology ही नामांकित कंपनीची सुस्थापित केली आहे. या त्यांच्या कार्यामुळे शिंदे दांपत्त्याला आदर्श मातापिता पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुनिल साठे, फिरोजखान (संस्थापक अध्यक्ष)भारतीय रिपब्लिकन मायनाॅरिटीज फेडरेशन व विक्रम पवार(संस्थापक अध्यक्ष)ह्युमन राईट्स फाउंडेशन हे होते.
 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल साठे तर आभार प्रदर्शन डाॅ.मदन कोठुळे (माजी राज्यमंत्री) यांनी केले.
        
यावेळी सौ. शामल शिंदे, प्रा. माणिकराव शिंदे, सुनिता लोखंडे लक्ष्मण लोखंडे,सुनील चौधरी, अजय कांबळे, संतोष शिंदे, शशिकला म्हात्रे, प्रणव माने, राहुल लोखंडे, विकास जगताप, मंथन भोकरे, मीनानाथ भोकरे, शुभांगी भोकरे, मुकेश पवार, महेंद्र सोनवणे, सुरेश सकट, प्रीती परदेशी, भारती परदेशी, जयंत धर्माधिकारी, रंजनी धर्माधिकारी, राजु परदेशी, अनिता परदेशी,श्रीधर चापने, शशिकला चापने, योगिता धवाले, माधुरी सांगनाले, करुणा एखतपूरकर,विक्रांत शिंदे, सतीश परदेशी, रोहिदास बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top