तुळजापूर , दि . १८

 तुळजापूर तालुका पेन्शनर संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयास कॉम्प्युटर प्रिंटर भेट देण्यात आला आहे.

तत्पूर्वी गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांनी पेन्शनरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी मोहन राऊत, कनिष्ठ सहायक नाईकवाडी, पवार, कनिष्ठ प्रशासक उषा मगर, अखिल महाराष्ट्र सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष संदिपान साळुंके, उपाध्यक्ष जाधव, सरचिटणीस मैनुद्दिन शेख, सहचिटणीस यादगिरे, तालुकाध्यक्ष घागरे, उपाध्यक्ष गुरव, बंडगर, कोळी, एकनाथ लोखंडे, जानराव आदी सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल संदीपान साळुंके यांनी पेन्शनर संघटनेेचे आभार व्यक्त केले.
 
Top