तुळजापूर , दि. १८
मोक्षदा एकादशी निमित्त श्री रेणुका भजनी मंडळाच्या वतीने येथील प्रतापराव ताकमोघे यांच्या निवास्थानी भक्ति गीतांचे भजन कार्यक्रम करण्यात आला यावेळी श्री विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये महिलांनी अभंग, देवीचे गाणे, गवळणी, भारुड, असे विविध भक्तिगीते सादर केली भक्ती भजनाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी भजनी मंडळातील महिलांनी टाळ मृदुंगाच्या जय घोषणेनी सर्व परिसर भक्तिमय केला. यावेळी श्री रेणुका भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. शशिकला विद्याधर पाठक, उपाध्यक्षा मालती माधवराव रोहिणकर, सचिव सुबोध मुरलीधर निमकर, यांच्यासह सौ. कृपावती प्रतापराव ताकमोघे, सौ अलका श्यामकांत दिंडोरे, सौ मेघा महेश रोहणकर, सौ प्रमिला अभिमन्यू डांगे, साधना हरिभाऊ मंगसुळे, लक्ष्मी अशोक दीक्षित, नंदा अप्पासाहेब साळुंके, कुसुम कमलाकर राजहंस हिप्परगेकर, सौ. मंगल पाठक यांची उपस्थिती होती.