काटी , दि .०३

 तुळजापूर तालुक्यातील सुरतगांव केंद्रांतर्गत गोंधळवाडी येथे गुरुवार दि. 2 रोजी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
       

या सत्कार सोहळ्यात  सुरतगांव केंद्रातून केंद्रप्रमुख ह्या पदावरून पदोन्नतीने उस्मानाबाद ग्रामीण बीटमध्ये विस्तार अधिकारी म्हणून बदली झालेले रमाकांत वाघचौरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच सन 2020-21 चे तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका श्रीमती अनिता जांभळे,सन 2021-22 चे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक उत्तरेश्वर पैकेकरी, सुरतगांव केंद्राचे प्रभारी नूतन केंद्रप्रमुख राजेश धोंगडे,काटी बीटमधून नवोदयधारक व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनी कु.अनुजा कुंभार तसेच मुख्याध्यापक पदोन्नतीने सुरतगाव केंद्रातील घटक शाळांवरील मुख्याध्यापक  धनाजी कदम,सगर सर या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते फेटा,शाल,श्रीफळ,पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन  सन्मान करण्यात आला. 

यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून  गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव तर प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी काळे तुळजापूर तालुका शिक्षक सह.पतसंस्थेचे चेअरमन धनंजय मुळे,अखिल महा.राज्य प्राथ.शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजेश धोंगडे यांनी केले. शांताराम कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात ग.शि. अर्जुन जाधव यांनी गोंधळवाडीच्या शाळेचे कौतुक करीत 'बाला उपक्रमाची' प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शुभेच्छा देऊन शैक्षणिक बाबतीत मार्गदर्शन केले.  आभार लालासाहेब मगर यांनी तर  सूत्रसंचालन श्रीमती.जयमाला वटणे यांनी केले.
 
Top