नळदुर्ग , दि. २१
मागील काही दिवसात झालेल्या विकास कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी नागरिकांकडून, सामाजिक कार्यकर्त्याकडून व लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने हुतात्मा निलय्या स्वामी उद्यान विकसित करणे, हुतात्मा बाबूराव बोरगावकर उद्यानाचे विकसिकरण, मागील झालेल्या कामाचे नवीन अंदाजपत्रक तयार करून झालेली कामे, सध्या सुरू असलेले सहा कोटी रकमेची कामे अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचे व निविदा प्रक्रिया पार पडत असताना विशिष्ट ठेकेदारास नजरेसमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबवल्याचा व नगराध्यक्षा नेहमीपालिकेत गैरहजर असतात या बाबींचा उल्लेख या तक्रारीत करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.