काटी , दि . १२
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रूक्मिणी फाऊंडेशनच्या वतीने वसंतराव नागदे यांची उस्मानाबाद जनता बॅकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्धल सत्कार करण्यात आला.
जनता बॅकेच्या निवडणुकीत नागदे मोदानी शिंदे पॅनेलने घवघवीत यश मिळवत विरोधकांचे डिपाॅझीट जप्त केले.नंत्तर संचालक मंडळाच्या बैठकीत नागदे यांची अविरोध निवड करण्यात आली.या निवडीबद्धल रूक्मिणी फाऊंडेशनच्या वतीने .वसंतराव नागदे यांचा सचिव प्रा.अभिमान हंगरकर,सरपंच परिषदेचे जिल्हाध्याक्ष सुजित किसनराव हंगरगेकर,अनिल सुर्यभान हंगरकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,बुके देउन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.अभिमान हंगरकर,उस्मानाबाद सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,अनिल हंगरकर,आर्यन हंगरकर,करंडे आदी उपस्थित होते.