तुळजापूर ,दि . ५
तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील उपसरपंच आनंदराव विनायक उंबरे पाटील यांचे वडील विनायक आनंदराव उंबरे पाटील यांचे शनिवारी दुपारी १२ : ४० च्या दरम्यान अल्पशा आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे . पाटील यांच्या निधनाची वार्ता समजताच संपुर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.