मुरुम , दि . ०४ 

येणेगूर  - मुरुम मोड ते उस्मानाबाद जिल्ह्या हद्दीतील बोळेगाव गावापर्यंतच्या 28कि.मी.रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जि.प.विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.

मध्य प्रदेश ,महाराष्ट्र ,कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी या नावाने नामकरण झाले असून केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकलपनेतून साकार झाला आहे .अक्कलकोट तालुका व लातूर नजीकच्या रस्त्याचे काम प्रगतीवर आहे तर औसा ते उमरगा चौरस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. फक्त मूरूम मोड ते बोळेगाव या 28 कि.मी.लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. विशेषतः मुरुम ,बेळंब ,आलूर , बोळेगाव हा रस्ता खड्डे मय झाला आहे. याबद्दल  वारंवार आवाज उठवल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग सोलापूर कार्यालतयाने दखल घेत शनिवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात  केली . या 28 कि.मि.लांबीच्या कामासाठी 67कोटी रूपयेचा ठेका एस.एम औताडे या कंपनीने घेतला असून 18 महिन्यात काम पुर्ण करण्यात येणार असल्याचे उप अभियंता विजयकुमार स्वामी  यांनी सांगितले. 


या महामार्गाची सुरूवात मध्यप्रदेश सीमेवरील देवगाव गावापासून होत असून शेवटचे टोक कर्नाटक सीमेवरील तोळणूर या गावापर्यंतच्या 80 कि.मी. लांबीच्या रस्ता सोलापूर महामार्ग बांधकाम कार्यालयाकडून करवून घेण्यात येत आहे. अक्कलकोट तालुक्यातून जाणाऱ्या  या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले  असून 28 कि.मी.रस्त्याचे कामास सुरुवात झाल्याने इंडी ,विजापूर जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता होत असल्याने प्रवाशी व वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. 


कार्यक्रमास जि.प.विरोधी पक्षनेते शरण पाटील माजी सरपंच योगेश राठोड, रणजित राजपूत, गौस शेख ,विलास राठोड,अभिजित कुलकर्णी आदी उपस्थित होते .
 
Top